आता ‘बाबरी’वरून ठाकरे-शिंदे यांच्यात जुंपली..

0
20220427_204010

आता ‘बाबरी’वरून ठाकरे-शिंदे यांच्यात जुंपली..

मुंबई, दि. ११ एप्रिल :

जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. आता एक एक बिळातून बाहेर येत आहेत. चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. सत्तेसाठी लाचारी करणारे शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे अथवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

 

चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही तोफ डागली, ते पुढे म्हणाले की,बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे आता कुणाला जोडे मारणार आहेत ? की स्वतःच स्वतःला जोडे मारणार आहेत? चंद्रकांत पाटील बोलले आहेत, श्रेयवादाचा प्रश्नच नाही पण पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. आता भाजपच्या कार्यालयात सराव सुरु असेल त्यानंतर शिंदेंची प्रतिक्रिया येईल त्यावर नंतर बोलू. शिंदेंना बाळासाहेबांचे व शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटोपण वापरु नये.

 

बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाही. ही भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसते ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाही म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. सत्तेसाठी लाचारी करणारे शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये.

बाबरी पाडली त्यावेळी शिवसैनिक नव्हते असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते त्यावर शिवसेनेने त्यांच्यावर तोफ डागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *