गुलाबराव घोरपडेंच्या निधनाने काँग्रेसने निष्ठावान कार्यकर्ता गमावला..

0
20230408_094833

गुलाबराव घोरपडेंच्या निधनाने काँग्रेसने निष्ठावान कार्यकर्ता गमावला..

मुंबई, दि. ८ एप्रिल :

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गुलाबराव घोरपडे यांचे निधन अत्यंत धक्कादायक व मनाला वेदना देणारी घटना आहे. घोरपडे हे काँग्रेस विचारांचे पाईक होते, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही. घोरपडे यांच्या निधनाने काँग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

अॅड. गुलाबराव घोपरडे यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. मननिळावू स्वभाव, दांगडा जनसंपर्क व जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. घोरपडे यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद दहा वर्ष भुषवले, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. त्यांच्या अकाली जाण्याने कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच काँग्रेस कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.

अॅड. गुलाबराव घोरपडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी घोरपडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *