आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन प्रश्न सोडवा…

0
images (79)

आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन प्रश्न सोडवा…

मुंबई, दि. १५ मार्च ;

वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी विज पुरवठा, शेती कर्ज माफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करुन शासन वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सभेच्यावतीने लाँगमार्च सुरु करण्यात आला आहे. दिंडोरीहून आंदोलक शेतकरी रखरखत्या उन्हातून चालत मुंबईच्या वेशीवर आले आहेत. त्यांच्याबरोबरची मुख्यमंत्र्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे, तरी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी विज पुरवठा, शेती कर्ज माफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करुन शासन वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सभेच्यावतीने लाँगमार्च सुरु करण्यात आला आहे.

रविवार (दि. 12 मार्च) पासून दिंडोरी (जि.नाशिक) येथून त्याची सुरवात झाली आहे. या लाँगमार्चमध्ये वीस ते पंचवीस हजार आंदोलक शेतकरी सहभागी झाले आहेत. आंदोलक मुंबईच्या वेशीवर दाखल झाले आहेत. तरी सरकारने या आंदोलकांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *