शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज जगातील एकमेव राजे ..

0
IMG-20230310-WA0078

शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज जगातील एकमेव राजे ..

नाशिक, दि.१० मार्च :-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे सैनिक होते. मराठा, रामोशी, कोळी, मुस्लीम, बेरड, दलित, माळी यासह विविध समाजातील सैन्याचा त्यात समावेश होता. शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या प्रशासनात मानवतेचं जे धोरण अवलंबलं होतं, ते कोणत्याही धर्मावर आधारित नव्हतं. त्यांनी रयतेचे राज्य उभं केल होते. त्यामुळे कुठल्याही एका जातीच्या चौकटीत त्यांना उभं करून धर्मा धर्मात वाद निर्माण करू नये असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

 

कळवण येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार शरदचंद्र पवार आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांना सरकारी सुविधा देणारा पहिला राजा म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज होते. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, असा आदेश सैन्याला दिला. त्यामुळे लुटालूट करणारे सैन्य, सरदार, वतनदार ही प्रतिमाच बदलली. सैनिकांच्या घोड्याने जरी शेतकऱ्यांच्या शेतीतला पालेभाज्या खाल्ला तरी त्या शेतकऱ्याला भरपाई देण्याचे आदेश शिवाजी महाराज यांनी दिले होते. एखाद्या वर्षी समजा शेतकऱ्यांचे नुकसान झाले मग ते नैसर्गिक असु की युद्धाने असो त्यावर्षी महाराज शेतकऱ्यांचा सारा माफ करुन टाकायचे आणि शेतकऱ्याला पुन्हा उभे करायचे याची आठवण त्यांनी करून दिली.

विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते असे म्हणणे सार्थ ठरते. जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा होता त्याने सर्वप्रथम प्राधान्य हे शेतकऱ्यांना दिले. शिवाजी महाराजांचे सैन्य कोण होते, हे सगळे कष्टकरी, शेतकरी, मजुर, अलुतेदार, बलुतेदार सगळा बहुजन वर्ग या सर्व सैन्याची ते काळजी घेत होते. महाराज म्हणजे सर्वप्रथम रयतेच्या पोटास लागावे अश्या विचारांचे राज्यकर्ते होते असे गौरोदगार त्यांनी काढले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आपल्या समोर मांडला जात नाही. छत्रपति शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा फुले यांनी शोधली. रायगडावर महाराजांची समाधी अगदी भग्न अवस्थेत होती ती महात्मा फुले यांनी शोधली त्या ठिकाणी असलेला कचरा,काट्या, झाडे-झुडपे त्यांनी साफ केली आणि त्यावर फुले वाहिली. महात्मा फुले इथेच थांबले नाही त्यांनी त्या समाधीचा जिर्णोधार केला. महात्मा फुले छत्रपति शिवाजी महाराज यांना कुळवाडी भुषण अशी उपाधी दिली. त्यांनी पुण्यात येऊन छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती सूरू केली. त्यांनी शिवजयंती सुरु करुन तुमचा, आमचा राजा त्यांनी घरा घरात पोहचविला. जगात पहिला पोवाडा त्यांनी लिहला हा तब्बल एक हजार ओळींचा हा पोवाडा फक्तच लिहला नाही तर तो प्रसिद्ध देखील केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पहिला पोवाडा हा महात्मा फुले यांनी लिहला, आणि दुसरा पोवाडा कोणी लिहला असेल तर तो जातीने मुस्लिम असलेल्या शाहीर अमर शेखाने लिहला आणि हा पोवाडा भारतापासुन, रशिया पर्यंत गाणारा माणुस म्हणजे मातंग समाजाचा अण्णाभाऊ साठे. हे शिवरायांच्या विचारांचे खरे वारसदार, शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राजे आहेत हे आपल्याला सांगणारे महात्मा फुले आहेत. शिवाजी महारांजी कार्यपद्धती ही जनसेवेची होती, रयतेचे राजे कसे असावेत याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिला असे त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते अजिंक्य असा लढवय्या पुरुष होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. त्यांनी आपले बेत उत्तम रीत्या आखून ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत उतरविले. स्वराज्याच्या कारभारात त्यांनी सर्व जातींतील गुणी माणसे सामावून घेऊन त्यांच्याकडून ती ती कामे करवून घेतली. त्यांच्या या कार्याबद्दल मुंबई–लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारात अलेक्झांडर द ग्रेट, सीझर आणि हॅनिबल या पराक्रमी शूर वीरांबरोबर शिवाजी महाराजांची तुलना करण्यात आली आहे ही आपल्यासाठी कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

 

देशात आणि जगात असंख्य पुतळे पद्मभूषण व प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या हस्ते तयार झाले आहे. त्यांची ही कला अतिशय उत्कृष्ट असल्याबाबत त्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच कळवण तालुक्याच्या वैभवात भर घालणारा, उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच असा २१ फुटी पुतळा जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या सिद्धहस्त शिल्पकलेतून साकार झाला आहे. या ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्याबद्दल कळवण तालुका छत्रपती स्मारक समिती व शिवप्रेमीचे आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *