गरिबांना पैसे द्या, उद्योगपतींना नाही, खर्च वाढवा!
राहुल गांधी यांचा मोदींवर हल्लाबोल.
आरबीआयच्या अहवालावरून राहुल गांधी आक्रमक.
नवी दिल्ली, दि. २६ ऑगस्ट:
‘मी मागील अनेक महिन्यांपासून देत असलेल्या इशाऱ्यांना आरबीआयने आज दुजोरा दिला आहे. सरकारने अधिक खर्च करावा, अधिक उधार देऊ नये. गरीबांना पैसे द्यावेत, उद्योपतींना करांमध्ये कपात नाही..अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणावे’ असे ट्विट करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे.
कोरोनाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहेच पण त्याचा सर्वात मोठा परिणाम गरिब लोकांवर झाला आहे. रोजगार नाहीत, हाताला काम नाही त्यातच महागाई प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांने जगणे मुश्कील झाले आहे. सरकारने लोकांच्या हातात पैसे येतील असे उपाय योजले तरच लोकांची खरेदी करण्याची शक्ती वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल. लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद पडले आणि लाखो नोकऱ्या गेल्या. बेरोजगारीत मोठी वाढ झाली आहे. हे चित्र निराशाजनक आहे. हे चित्र बदलण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे,असे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी फेब्रुवारीमध्येच सर्वात पहिल्यांचा अशा प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागेल असा इशारा दिला होता. परंतु राहुल गांधी यांच्याकडे दुर्लक्ष करुन त्यांना महत्व देत नाही तसेच विरोधी पक्षाला किंमतच न देता ‘हम करो सो कायदा’, या मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे त्याचे चटके मात्र १३० कोटी जनतेला भोगावे लागत आहेत.
