त्रिपुरामध्ये पुन्हा भाजपचे कमळ फुलणार
त्रिपुरामध्ये पुन्हा भाजपचे कमळ फुलणार…
आगरतळा, दि.१२ फेब्रुवारी –
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा देशभर असून त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत पुन्हा दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलणार आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. धनपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते.
त्रिपुरामध्ये भाजपला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असून प्रतिमा भौमिक यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले. यावेळी रिपाइंचे त्रिपुरा राज्य अध्यक्ष सत्यजित दास उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्रिपुरा मध्ये भाजप सरकार ने चांगले काम केले आहे. त्रीपूरतील आदिवासी दलित अल्पसंख्यांक सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम मोदींच्या नेतृत्वात झाले आहे. भाजप च्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा असल्याचे सांगत यंदा त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीत भाजप ला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
भाजपला आणि आपल्या उमेदवारीला रिपब्लिकन पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल धनपूरच्या भाजप उमेदवार आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी रामदास आठवले यांचे आणि रिपब्लिकन पक्षाचे जाहीर आभार मानले.
