मुंबई महानगरपालिकेचे बजेट केवळ ‘ठेकेदारांचे बजेट’ !

0
20220519_112635

मुंबई महानगरपालिकेचे बजेट केवळ ‘ठेकेदारांचे बजेट’ !

मुंबई, दि. ५ फेब्रुवारी ;

मुंबई महानगर पालिकेच्या बजेटमध्ये कुठलाही प्रकल्प नाही, अनेक वर्ष काही प्रकल्प सुरु आहेत. आॅगस्ट महिन्यात पाच हजार कोटींचे टेंडर होते यंदा जानेवारी महिन्यात ते साडे सहा हजार कोटींचे करण्यात आले. मुंबई मनपाने टेंडर दिले त्यावर श्वेतपत्रिका काढायला हवी. सौंदर्यीकरणाचे १७०० कोटी मागच्या नगरसेवकांच्या फंडातून वळते करण्यात आले होते हा अधिकार आयुक्तांकडे आहे का? स्थायी समितीने जे पैसे मंजूर केले आहेत ते वळते करता येतात का? हे लोकांना कळणे गरजेचे आहे! नविन प्रकल्प नसतांना खर्च कसा वाढला? ठेकेदारांचा फायदा करण्यासाठी हे बजेट वाढले आहे का? असे प्रश्न उपस्थित करत बीएमसीचे बजेट हे केवळ ठेकेदारांचे बजेट असून मैत्रीसाठी केलेले आहे असा घणाघाती आरोप शिवसेना युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.

बजेटवर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, स्काॅयवाॅकसाठी ७५ कोटी ते कुठे करणार कसे करणार? सीएसआर फंडातून हा खर्च देता येईल परंतु तसे होतांना दिसत नाही. ह्याला मंजुरी आयुक्तांचीच. इतक्या वर्षांची लोकशाही प्रथा बाजूला ठेवली. प्रस्ताव दिलेलाच मंजूर करतोय. मुंबईकरांचा पैसा जपून वापरावा परंतु घटनाबाह्य सरकार तसे करतांना दिसत नाही. उत्पन्न कमी, खर्च जास्त होतो आहे. शिवसेनेचे वचन होते ५०० चौ फु घरांना कर माफी, हे कारण तोट्याचे दाखवतात आहे. मूळ मुंबईकरांना नुकसान दाखवतायत. मुंबईची मान दिल्ली समोर झुकवायची. मग दिल्लीकडे पैसे मागायचे.

आज ठेवी या कसा वापरला जातो हेच यातून दिसेल. शिवसेनेने मुंबईकरांचा पैसा वाचवलेला आहे. कोस्टल रोड हे उध्दव ठाकरेंचे स्वप्न त्यात एकही पैसा न वाढवता हा प्रकल्प राबवला जातोय. गोरेगाव मुलुंड सी लिंक असेल सारखे अनेक प्रकल्प नवा कर आणि टोल न लावता राबवायचे आहेत पण कोस्टल रोड आता चार टोल या सरकारने लावले. मुंबई मनपाला साहेसहा हजार कोटी सरकारला देणे आहे. गेल्या सहा महिन्यात दिवाळखोरी सुरु आहे. ती वाटचाल सुरु आहे. आजचे मनपाचे बजेट बघून प्रत्येकाला ते वाटेल.

शिवसेनेनी इतकी बचत ठेव वाचवून ठेवली म्हणूनच मुंबईकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला. आमचे प्रकल्प ठेकेदारांच्या मदतीला आहे का? एअर प्यूउरीफायर निरुपयोगी आहेत. धूळ ठेकेदार बिल्डर कडून येते तिथे हे बोलत नाहीत, सगळे मित्र आहेत यांचे. बचतठेवी ह्या पारदर्शक राज्यकर्त्यांचा अभ्यास कच्चा. सगळे प्रकल्प आमच्या काळातले आम्ही प्रचार केला नाही. गेल्या अडीच वर्षात आपण पर्यावरणावर काम केले, आम्ही धमक दाखवली असेही ठाकरे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *