नवी मुंबई-कल्याण डोंबिवली वाहतुक कोंडीतून होणार सुटका.
नवी मुंबई-कल्याण डोंबिवली वाहतुक कोंडीतून होणार सुटका..
मुंबई, दि. २८ जानेवारी;
ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगद्यात ब्लास्टिंग करण्यात आले. या ब्लास्टिंगमुळे हा बोगदा एकमेकांना जोडला जाणार जाणार आहे. या नव्या रस्त्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी होणार आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
नवी मुंबई येथून डोंबिवली, कल्याण,अंबरनाथ, बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत कमालीची बचत होणार आहे. या मार्गामुळे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीचे अंतर अंदाजे सात किलोमीटरने कमी होणार असून वेळेचीही बचत होणार आहे. या ब्लास्टनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष जाऊन या बोगद्यातील कामाची पाहणी केली. यावेळी एमएमआरडीए आयुक्त एस. सी. आर. श्रीनिवास आणि एमएमआरडीएचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने आकारास येत असलेल्या या मार्गाच्या बांधकामास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर वेग आला. येण्यासाठी एक आणि जाण्यासाठी एक आशा दोन मार्गिका या मार्गावर असून त्यातील पहिली मार्गिका खुला होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
सध्या या भागातील रहिवाशांना नवी मुंबईला जाण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा मार्ग पूर्ण झाल्यास वाहतुकीचा त्रास कायमचा दूर होणार आहे.
