राज्यपाल कोश्यारींच्या ‘त्या’ विनंतीचा नरेंद्र मोदींनी विचार करावा!

0
images - 2022-12-11T210627.720

राज्यपाल कोश्यारींच्या ‘त्या’ विनंतीचा नरेंद्र मोदींनी विचार करावा!

मुंबई दि. २३ जानेवारी –

राज्यपाल यापूर्वी आम्हालाच सांगत होते मुझे जाने का है… आता लेखी विनंती केली आहे तर केंद्रसरकार लेखी निवेदनातील विनंतीचा विचार करेल असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातून जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मधल्या काळात राज्यपालांनी जी वक्तव्ये केली ती बघता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता राज्यपालांनीच इच्छा व्यक्त केली आहे. असेही जयंत पाटील म्हणाले.

केंद्रसरकारच्या काही प्रोसीजर बाबी असतील किंवा त्यांना नवीन राज्यपाल रिप्लेस करण्यासाठी माणूस मिळाला नसेल असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *