दाव्होस मध्ये पहिल्याच दिवशी ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक.
दाव्होस मध्ये पहिल्याच दिवशी ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक.
दाव्होस दि. १७ जानेवारी :
स्वित्झर्लंड येथील डाव्होस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १०००० तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
यावेळी करण्यात आलेल्या सामंजस्य काराराबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
१. Greenko energy Projects Pvt. Ltd १२००० कोटींची गुंतवणूक.
२. Berkshire Hathaway Home Services Orenda India १६००० कोटींची गुंतवणूक
३. ICP Investments/ Indus Capital १६००० कोटींची गुंतवणूक
४. Rukhi foods २५० कोटींची गुंतवणूक
५. Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. १६५० कोटींची गुंतवणूक.
