काँग्रेस पक्ष सत्यजित तांबेवरही कारवाई करणार !

0
999

काँग्रेस पक्ष सत्यजित तांबेवरही कारवाई करणार !

मुंबई, दि. १६ जानेवारी:

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. अधिकृत उमेदवारी डॉ. सुधीर तांबे यांना दिलेली असताना त्यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही. उलट त्यांचा मुलगा युवक काँग्रेसचा माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदावारी दाखल करुन काँग्रेस पक्षाची कोंडी केली. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्द दाखल न करने हे काँग्रेससाठी धक्कादायक आहे.

डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाला अंधारात ठेवून उमेदवारी अर्ज दाकल न केल्यानं संतप्त झालेल्या काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित केले आहे. डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीनवेळा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. माजी महसूलमंत्री तसेच विद्यमान काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे ते मेव्हुणे आहेत. पण पक्षाने सुधीर तांबे यांनी निलंबित केले आहे.

सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन-तीन दिवसात सत्यजित तांबे यांच्यावर दिल्लीच्या आदेशानुसार कारवाई होऊ शकते. परंतु या सर्व गदारोळात काँग्रेस पक्षाची प्रचंड नाच्चकी झाली आहे. सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली असती तर त्यांना मिळाली असती पण त्यांनी उमेदवारीही मागितली नाही उलट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेसची गोची केली. भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याबद्दल संकेत देऊनही काँग्रेस पक्षाने त्याची वेळीच दखल घेतली नाही त्याची मोठी किंमत पक्षाला मोजावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *