मेट्रो ७ व मेट्रो २ अ १९ जानेवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत!

0
४४

मेट्रो ७ व मेट्रो २ अ १९ जानेवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत!

मुंबई, दि. १३ जानेवारी:-

मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी परिसरातील गुंदवली स्थानकाला भेट देऊन लोकार्पण सोहळ्याची तसेच तेथील सुविधांची पाहणी केली. मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग ‘२अ’ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग २ अ चा ३५ किलोमीटर्सचा टप्पा पूर्ण झाला आहे. यातील ३३ स्थानके लोकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. हा टप्पा लोकांच्या सेवेत येण्याने अधेंरी, दहिसर, वर्सोवा या परिसरातील मुंबईकरांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल.

रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल. त्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या १९ जानेवारीला होणार आहे. या मेट्रोचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते झाले होते, हा एक मोठा योगायोग आहे. लाखो लोकांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. लोकांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. ही मेट्रो लाखो मुंबईकरांसाठी वरदान ठरेल.

मुंबईमध्ये आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. रखडलेले हे प्रकल्प आम्ही वेगाने मार्गी लावले आहेत. त्यातील काही प्रकल्पांचे मग ते काँक्रीटचे रस्ते, एसटीपी प्लांट, आरोग्याचे विषय, सुशोभीकरण अशा गोष्टी असतील त्यांचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ही मुंबईकर नागरिकांसाठी एक मोठी भेट ठरेल, असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले.

मुंबई मेट्रो मार्ग ७  – एकूण लांबी १६.५ किमी, एकूण स्थानके १३ (उन्नत)

कार्यान्वयीत स्थानकेः ९ (टप्पा-१) (१) ओवरीपाडा (२) राष्ट्रीय उद्यान (३) देवीपाडा (४) मागाठाणे (५) पोईसर (६) आकुर्ली (७) कुरार (८) दिंडोशी (९) आरे

टप्पा-२ मधील स्थानके: ४ (१) गोरेगाव पूर्व (२) जोगेश्वरी पूर्व (३) मोगरा (४)

इंटरचेंज स्थानके: (१) गुंदवली- मेट्रो मार्ग १ वरील पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकासोबत (२) जोगेश्वरी पूर्व मेट्रो मार्ग ६ सोबत

मुंबई मेट्रो मार्ग २ अ – एकूण लांबी १८.६ किमी, एकूण स्थानके: १७ (उन्नत)

कार्यान्वयीत स्थानकेः ९ (टप्पा-१) ((१) दहिसर पूर्व (२) आनंद नगर (३) कांदरपाडा (४) मंडपेश्वर (५) एकसर (६) बोरिवली प. (७) पहाडी एकसर (८) कांदिवली प. (९)) डहाणुकरवाडी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *