विद्यापीठांनी गुणवत्ता व शैक्षणिक शिस्तीचे नियोजन करावे
विद्यापीठांनी गुणवत्ता व शैक्षणिक शिस्तीचे नियोजन करावे
मुंबई, दि. ६ जानेवारी :
विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नावीन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत असताना काही अडचणी येऊ शकतात. परंतु गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे, विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
राजभवन येथे विद्यापीठ कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
कोश्यारी म्हणाले, त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थिती नुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण सहज आणि सुलभ उपलब्ध होणे महत्वाचे आहे. यासाठी सर्वांचे मार्गदर्शन आणि साथ महत्वाची आहे. शैक्षणिक अडचणी आणि त्यावर उपाययोजनासाठी विद्यापीठ आणि राज्य शासन यांनी समन्वयातुन कार्य करावे.
