भाजपचे हे चेलेचपाटे ‘तेंव्हा’ कुठे होते?

0
mahesh-tapase

भाजपचे हे चेलेचपाटे ‘तेंव्हा’ कुठे होते?

मुंबई दि. ३ जानेवारी –

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्य रक्षक’ म्हणून संबोधल्यानंतर भाजपने गळा काढायला सुरुवात केली आहे मात्र भाजपानेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा हेच भाजपचे चेलेचपाटे कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची वक्तव्ये भाजप मंत्री करत असताना हेच भाजपचे नेते बघ्याच्या भूमिकेत होते आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटले नाही म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत मात्र त्यांचा हा दुटप्पीपणा आजच्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून समोर आला आहे.

ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहित नाही, अजित पवार काय म्हणाले हे माहीत नाही, आपण कशासाठी आंदोलन करत आहोत हे माहीत नाही, त्यावरून भाजपचे आंदोलन म्हणजे फक्त धुळफेक आहे अशी टीकाही महेश तपासे यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *