संत्रा उत्पादकांना वाहतूक पॅकेजिंगसाठी अनुदान द्या..

0
images - 2022-12-29T143459.048

संत्रा उत्पादकांना वाहतूक पॅकेजिंगसाठी अनुदान द्या..

नागपूर, दि. २९ डिसेंबर –

नागपूरमधील संत्रा उत्पादक जवळपास २ टन संत्री या काळात बांगलादेशला पाठवतात. त्यामुळे या संत्रा उत्पादकांना आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी वाहतूक, पॅकेजिंगसाठी सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

तसेच बांगलादेश ही सीमा १३०० किमी दूर आहे, तेथे आयात शुल्क अधिक आहे. गेल्या काही दिवसात तेथे आयात शुल्कात प्रचंड फरक पडलेला आहे. त्यामुळे आपल्या  भागातून जो संत्रा बांगलादेशला जातो त्यासाठी वाहतूक आणि पॅकेजिंगसाठी  सरकारच्या माध्यमातून मदतीची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकां विषयी विदर्भ आणि मराठवाडा अतिशय मागे आहे. केंद्रात या विभागाचे मंत्री हे महाराष्ट्राचे आहेत. या विभागाच्या अनेक योजना असून त्याबाबत  जनजागृती करणे आवश्यक असल्याचे दानवे यांनी म्हटले. या विभागासाठी केंद्राकडे भरपूर निधी उपलब्ध आहे , कित्येक योजनांचा आपण फायदा घेत नाही. मार्केट कमिटीला ५ कोटींचा निधी फळ प्रक्रियेसाठी देण्यात येतो त्यामुळे जनजागृती करणे आवश्यक आहे.

मेळघाटसारख्या भागातील मुले शाळेत जाऊ शकत नाही, तेथे २०० ते ३०० लोकसंख्या असलेले पाडे व  वस्त्या आहेत. त्यामुळे मेळघाटातील हे भाग लोकसंख्येच्या निकषातून बाहेर काढावे. या भागात अंगणवाड्यांना  असलेली अट शिथिल करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. बुलढाणा येथील सिंदखेड या जिजाऊमाता यांच जन्मस्थान असलेल्या ठिकाणाला गती देण्यासाठी प्रयत्न करावेत

विदर्भ, मराठवाडा येथील आयटी पार्कची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, जेणेकरून येथील बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लागेल आदी मागण्या लावून धरत सदर प्रस्तावाला उत्तर देताना राहिलेल्या मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते दानवे यांनी उत्तरादाखल भाषण करताना उपमुख्यमंत्री यांच्याकडून सदरची अधिक माहिती घेऊन विविध प्रश्न मार्गी लावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *