गैरप्रकार होणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांवर अंकुश ठेवा..

0
FB_IMG_1672212134149

गैरप्रकार होणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांवर अंकुश ठेवा..

नाशिक, दि. २८ डिसेंबर :-
शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी खाजगी संस्था उदयास आल्या आहे. या संस्थाना आपण विरोध केला तर जनतेत त्याबाबत चुकीचा संदेश जाईल तसेच आपलं राज्यही शिक्षणात मागे राहील. त्यामुळे खाजगी विद्यापीठ विधेयकाला आपला पाठींबा असल्याची स्पष्ट भूमिका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधेयकावर बोलतांना व्यक्त केली.

खाजगी विद्यापीठ विधेयकावर बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होण्याअगोदर राज्यात अत्यंत कमी वैद्यकीय व इतर महाविद्यालय होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राज्याबाहेर जावे लागत होते. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यानंतर राज्यात खाजगी संस्था उदयास आल्या. आज राज्यात रयतसह अनेक खाजगी संस्था कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या खाजगी संस्थाबाबत आपण विरोधात भूमिका घेतली तर त्याचा जनतेत चुकीचा संदेश निर्माण होईल. काही गैरप्रकार करणाऱ्या संस्थामुळे इतर संस्था देखील अडचणीत येतील. त्यामुळे ज्या संस्था गैरप्रकार करत असतील त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर राज्य शिक्षणाच्या बाबत पाउले पुढे टाकत आहे. या विधेयकाला आपण विरोध केला तर आपलं राज्याचे मोठ नुकसान होईल. आजही अनेक खाजगी शिक्षण संस्थामध्ये २५ टक्के राखीव व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही हा अन्याय होईल. या विधेयकाबाबत आपल्या काही सूचना किंवा उपसूचना असतील तर आपण सर्वांनी त्या मांडव्यात त्यानुसार सुधारणा करण्यात याव्यात मात्र पूर्णपणे विरोध करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी या विधेयकाला आपला पाठींबा दर्शविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *