…तोपर्यंत बेळगाव, कारवार सीमाभाग केंद्रशासीत प्रदेश करा !

0
20221226_175334

…तोपर्यंत बेळगाव, कारवार सीमाभाग केंद्रशासीत प्रदेश करा!

नागपूर, दि. २६ डिसेंबर:
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न विधिमंडळात गाजला. एक इंचही जागा देणार नाही ही कर्नाटकाची कौरवी वृत्ती आहे. कर्नाटक बेळगावात विधानसभा बांधते, उपराजधानी करते आहे आणि आमचे मुख्यमंत्री त्यावर ब्र सुध्दा काढत नाहीत. सर्वोच्च न्यायालयात जोवर हा विषय प्रलंबित तोवर हा कर्नाटकव्याप्त प्रदेश केंद्रशासित व्हायलाच हवा असा ठराव असायला हवा, अशी जोरदार मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात ज्या ग्रामपंचायतींनी आम्हाला त्या राज्यात जायचे आहे असे ठराव केले. आपण पक्ष बाजूला ठेवून काय कारवाई करणार आहोत? रोजचे व्यव्हार कानडी भाषेत करावे लागतात. या विषयावर कर्नाटकात सरकार कोणाचेपण असो ते एकजुटीने उभे राहतात. आजच कर्नाटक सरकार का पेटले आहेत. एक चर्चा अजून होणे गरजेचे, आपल्याच महापुरूषांचा अपमान आपण सहन करणार असू तर कर्नाटक आपला भाग मागणारच. अनेक लोक आपल्यातून आज निघून गेली. महाराष्ट्र एकीकरण समिती फुटली आता संयम संपत चाललाय कानडी अत्याचार थांबलाच पाहिजे केंद्रशासित प्रदेश करुन केंद्र पालक म्हणून जबाबदारीने वागेल अशी अपेक्षा आहे.

चर्चा करणार असू तर पूर्ण माहिती घेऊन धाडसाने चर्चा व्हायला हवी. मुख्यमंत्री येतील नाही येतील मला माहिती नाही. त्यांना दिल्लीतून कधी सोडतील का निघाल्यावर अर्ध्यातून परत बोलावतील. पण आजच्या आज हा ठराव व्हावा आणि केंद्राला पाठवावा अशी माझी विनंती.

मी ऐकलय ते म्हणाले मी लाठ्या खाल्ल्या पण तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होतात, आता तुम्ही सीमापार गेला म्हणून आता गप्प बसणे असे होत नाही. किती काळ चर्चा करायची? आज प्रश्न सुटायला पुरक परिस्थिती आहे. केंद्रात, दोन्ही राज्यात एका पक्षाचे सरकार आहे. आज मुख्यमंत्री दिल्लीत त्यांनी ह्या चर्चेत असणे गरजेचे होते. हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर कर्नाटकने एक एक पाऊल पुढे टाकले. आम्ही मराठी पाट्यांचा कायदा केला तर लोक न्यायालयात जातात. तिथे कर्नाटकात मराठी पाट्या लावल्या म्हणून राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले गेले. हा शिवसेनेचा ठराव. आमच्या जिव्हाळ्याचा विषय. शिवसेनाप्रमुखांना तीन महिने तुरुंगवास झाला, मनोहर जोशी, दत्ताजी साळवीही तुरूंगात गेले होते याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *