मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार..

0
IMG-20221218-WA0044

मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार..

नागपूर, दि. १८ डिसेंबर –
स्वविचाराने व महाराष्ट्रहिताचा कारभार हाताळण्याचा अभाव सर्वच क्षेत्रात ठळकपणे दृष्टीस येत असताना मुख्यमंत्री यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणे, आम्हाला योग्य वाटत नाही. सबब आपण आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला आहे,असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहून राज्यासमोरील प्रश्नांबाबत विचारविमर्श करणे हे विरोधी पक्षांचे कर्तव्य आहे. ते पार पाडण्यास निश्चितच आवडले असते. परंतु, उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेतली  तर, राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करण्यात, छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यात, राज्याचा अभिमान, स्वाभिमान जपण्यात, राज्यातील जनतेचे हित साकारण्यात तुमच्या नेतृत्वाखालील सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडले. राज्याकडून, केंद्रातून शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ शकला नाहीत. म्हणून चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत.

लोकशाहीच्या प्रथा, परंपरेप्रमाणे विधीमंडळाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमास निमंत्रित केल्याबद्दल पुन:श्च आभार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *