नागपूरचे ‘वनभवन’ आपल्या सर्वांसाठी ‘समाधानाचे भवन’ व्हावे :

0
IMG-20221218-WA0085(1)

नागपूरचे ‘वनभवन’ आपल्या सर्वांसाठी ‘समाधानाचे भवन’ व्हावे :

नागपूर, दि. १८ डिसेंबर:
झिरो माईलचे ठिकाण असलेल्या नागपुरातील ‘वन भवन’ हे खऱ्या अर्थाने ‘समाधान भवन’ व्हावे. जगातील १४ देशांमध्ये वाघ आहेत, त्यातील सर्वाधिक वाघ भारतात आहेत. भारताचे ‘टायगर कॅपिटल’ म्हणुन नागपूरची जगभरात ओळख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही ठाण्याचे वाघ म्हणून ओळखले जातात. ‘टायगर कॅपिटल’मध्ये ठाण्याच्या ढाण्या वाघाचे स्वागत करताना आनंद होत असल्याचा उल्लेख मुनगंटीवार यांनी करताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाट झाला.

शास्त्र सांगते की, जो मुक्या जीवांची भाषा ऐकतो, त्याची भाषा देवही ऐकत असतो. त्यामुळे वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी आपली सर्वांची आहे. वन भवनाची ईमारत ‘जी फाइव्ह’ आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी ट्वेन्टी’चे अध्यक्षपद स्वीकारताना त्यातील महत्त्वाचा विषय पर्यावरण आणि पर्यावरणीय बदल असल्याचे नमूद केले. आईची सेवा आणि वनराईची सेवा ही अतिशय मूल्यवान असल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

पर्यावरणातील वाढते प्रदूषण हा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. यावर मोठे विचारमंथन होत आहे. २००० ते २०२२ पर्यंत जगात प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. प्रदूषणात ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. माणूस स्वत:च्या आरोग्याची काळजी करतो; परंतु पृथ्वी आणि पर्यावरणाच्या आरोग्य संतुलनाची काळजी करीत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वन आणि जीवन ह्याचा शब्दशः जवळचा संबंध आहे. जीवनाचा ‘जी’ हा वनाशी खूप जवळचा आहे. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे, देशाचा झिरो माईल बिंदू इथे आहे, अशा देशाच्या हृदयस्थानी वन विभागाचं कार्यालय आहे. जसं मनुष्याच्या हृदयाचं कार्य असतं की अशुद्ध रक्त शुद्ध करणे, या कार्यालयात देखील हेच कार्य आहे. जी जी पर्यावरणात म्हणून अशुद्धता असेल, ती ती अशुद्धता शुद्ध करणे हेच काम या कार्यालयाचे आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावातील एस आणि फडणवीस यांच्या नावातील एफ असे सुपरफास्ट सरकार महाराष्ट्राला मिळाले आहे. त्यात पुन्हा ‘एकनाथ’ जींच्या नावातील ई हा इकॉनॉमिक आणि ‘देवेंद्र’ जींच्या नावातील ‘डी’ हा डेव्हलपमेंटचा आहे त्यामुळे सुपर फास्ट इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा ही राज्यात सुरू आहे. वन विभागानेही या परिस्थितीचा फायदा करून घ्यावा, असे मुनगंटीवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *