दिल्ली महानगरपालिका प्रमाणे मुंबईत पण ‘आप’चा झेंडा फडकणार

0
IMG-20221207-WA0096

दिल्ली महानगरपालिका प्रमाणे मुंबईत पण ‘आप’चा झेंडा फडकणार..

मुंबई, दि. ७ डिसेंबर :
आम आदमी पार्टीला दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत मिळालेला विजय ही सुरुवात असून यापुढे मुंबई महानगरपालिकेत आप स्वबळावर दणदणीत विजय मिळवेल आणि महानगरपालिकेत आपचा झेंडा फडकावेल, असा विश्वास आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी विजय उत्सवामध्ये व्यक्त केला.

मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उत्सवामध्ये मुंबई सह महाराष्ट्रातील सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. ढोल- ताशांचा कडकडाट आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या दणदणाटात गुलालाची उधळण करून विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला.

दिल्ली महानगरपालिका निवडणुकी नंतर मुंबई निवडणूक बाकी आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आप दणदणीत विजय मिळवेल. दिल्ली नंतर मुंबईतही आप स्वबळावर सरकार आणेल. मुंबई महानगरपालिकेत आप चा झेंडा फडकवायचा आहे. दिल्लीत आम आदमीचे सरकार आले आहे, आता जनता भ्रष्ट्राचारी सरकारला आपली जागा दाखवून देईल, असे मत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *