महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात एसटीची वाहतूक अंशत: रद्द

0
images (85)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात एसटीची वाहतूक अंशत: रद्द….

मुंबई, दि. ७ डिसेंबर :-
गेली काही दिवस महाराष्ट्र –कनार्टक सीमावर्ती भागात प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनूसार एसटी महामंडळाने आपल्या कर्नाटकात जाणा-या दैनदिन ११५६ फे-यापैकी ३८२ फे-या पुढील सूचना येईपर्यत अंशत: रद्द ठेवल्या आहेत.

महाराष्ट्राच्या विविध विभागातून सुटना-या एसटी बसेस  नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्हयातून कर्नाटक राज्यात जातात. यापैकी कोल्हापूरातून निपाणी-बेळगाव मार्गे जाणा-या सुमारे ५७२ फे-यापैकी ३१२ फे-या स्थानिक जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार  रद्द करण्यात आल्या आहेत. गडहिंगलज, चंदगड, आजरा, तळ कोकण व गोवाल्या जाणा-या बस फे-या निपाणी ऐवजी अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तसेच सांगली जिल्हयातील कर्नाटक राज्यात जाणा-या ६० फे-यापैकी २२ फे-या स्थानिक प्रशासनाच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य विभागातील संवेदनशील मार्गावरील ४८ फे-या रद्द केल्या आहेत.

कोल्हापूर शहरातून सौंदत्ती येथे सुमारे ७००० भाविकांना घेऊन गेलेल्या १४५ एसटी बसेस मध्यरात्री पर्यत कोल्हापूरात सुखरुप दाखल होतील. या बाबतीत आवश्यकता वाटल्यास कनार्टक पोलीस प्रशासनाने संबधित बसेसनां पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. दत्त जयंती निमित्त राज्यातील अनेक तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे. सोलापूर जिल्हयाच्या सीमावर्ती भागात कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे दत्त जयंती निमित्त यात्रा भरविण्यात आली आहे. या यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून सोलापूर-अक्कलकोट-गाणकापूर या मार्गावर जादा वाहतूक केली जात आहे. तेथे कोणतेही विघ्न आलेले नसून, यात्रा सुरळीत सुरु आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *