उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ बैठकीनंतर वेदांता फाॅक्सकाॅन गुजरातला गेला !!

0
20220519_112635

उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ बैठकीनंतर वेदांता फाॅक्सकाॅन गुजरातला गेला !!

मुंबई, दि. २९ नोव्हेंबर :

वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता तो कमी विकसित क्षेत्रात गेला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तो येणार असे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री खोटे बोलले. माहिती अधिकारात एका दिवसात उत्तर आले. आम्ही माहिती अधिकारात माहिती मागितली त्याला एक दीड महिना लागला. २९ /०८/२०२२ रोजी दुसरी बैठक झाली उपमुख्यमंत्र्यांची ती वेदांता याच राज्यात होण्यासाठी होती की गुजरातला देण्यासाठी होती? याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती का? खोटं कोण बोलत आहे उपमुख्यमंत्री का उद्योग मंत्री ? असा सवाल शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

आदित्य ठाकरे पुढे म्हणतात, ५ सप्टेंबर २०२२ चे पत्र अनिल अग्रवालांना एमआयडीसीचे महाव्यवस्थापकांचे. त्यात MOU करण्यासाठी येण्याची विनंती. सभागृहात पण मुख्यमंत्री बोलले. पत्रात सबसिडी, सुविधांचा उल्लेख. पुढे जाण्यासाठी मी आपणाला मुंबईला तुमच्या सोयीची तारीख निश्चित करण्यासाठी आमंत्रित करतो आहे. मी तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे असा पत्रात उल्लेख.

मी पुन्हा त्यांना आव्हान देतो चर्चा करण्याचे. नुसते आरोप केले जातात. परत परत हे का बोलतोय कारण कालच २८ तारखेला तीन वर्ष झाली असती. साडेसहा लाख कोटींची मविआची गुंतवणूक आणली. दावोस मधून गुंतवणूक आणली. महाराष्ट्रासाठी तुम्ही काम करणार की नाही?

२३/५/२०२२ चा दावोसचा फोटो आहे. अनेक प्रकल्प एमायडीसीत आहेत त्याला मंजुरी नाही. महाराष्ट्राच्या जनतेशी खोके सरकार खोटे का बोलते आहे? माहिती अधिकारात माहिती मिळाली त्याचाच उल्लेख आज केलाय. कुठल्याही राज्यात गुंतवणूक झाली तर आनंद. परंतु महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अखेरच्या क्षणी घालवला. ५ सप्टेंबरचे पत्र हे स्पष्ट करते की एमोयु कधी सही करायचा याचा उल्लेख.

हे पत्र एमायडीसीला खात्री होती. कॅबिनेट नोट, हाय पाॅवर कमिटी नोट सगळच आहे. काय झाले की गुंतवणूक गुजरातला गेली. मी इतकेच विचारतो मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती होती का?  ५ सप्टेंबर ला पत्र आहे याला उत्तर दिलेले नाही कंपनी ट्वीटरवर ११ सप्टेंबरला कळवतो. मी आरोप करणार नाही त्यात राजकारण मला करायचे नाही. युवकांना रोजगाराची संधी होती. तो प्रकल्प घालवला गेला ह्याचा ५ सप्टेंबर चे पत्र पुरावा…

मविआ काळात ९३% एमओयु सही झालेले हे टाईम्सने प्रकाशित केले. त्याची यादी देतो. सरकार बदलले तर तुम्हीच वातावरण बदलवले. टाटाचे कुठले अधिकारी म्हणाले महाराष्ट्रात गुंतवणूकीची परिस्थिती नाही. त्याचे नाव उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेले नाही. हे सरकार अल्पायुषी. म्हणून उद्योग महाराष्ट्रात येत नाहीएत. गद्दार आमदार मनासारखे वागतात, दडपशाही करतात यात उपमुख्यमंत्री यांचे नाव खराब होते. उद्योगमंत्र्यांचा खात्याशीच संबंध नाही.

२९/०८/२०२२ च्या उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा विषय काय याची माहिती उपलब्ध नाही. कोविड काळात मविआचे मुख्यमंत्र्यांचे, सरकारचे कौतुक झाले. सध्या असंवैधानिक सरकारची विश्वासार्हता नाहीए. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल पण वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत, महात्मा फुलें बाबत वादग्रस्त वक्तव्ये होऊन तुम्हाला चीड येत नाही का?  आता पर्यंत राज्यपाल महाराष्ट्राची भूमिका नेत होते. आताही पदमुक्त का करत नाही. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे उद्योग, उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायचे मनसुबे. अजूनही काही बोलत नाही राज्यपालांच्या बाबतीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *