महाविद्यालयीन प्रवेशासाठी आता मतदार नोंदणी बंधनकारक!

0
20221011_163626

महाविद्यालयीन प्रवेशासाठी आता मतदार नोंदणी बंधनकारक!

मुंबई, दि. 26 नोव्हेंबर :

लोकशाही मूल्य जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवत असताना महाविद्यालय, विद्यापीठ यांनी आता 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी केली आहे का? याची खात्री करून घ्यावी अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी लोकशाहीतील सहभाग यावर सादरीकरण करत मतदार नोंदणी प्रमाणाची माहिती दिली. मतदार नोंदणी 2023 अंतर्गत 18-19 या वयोगटातील 4 लाख 36 हजार 476 तर 20-29 या वयोगटातील 1 कोटी 58 लाख 68 हजार 757 मतदारांची नोंदणी आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी यासाठी निवडणूक शाखेने थिंक टँकची स्थापना केली आहे. शासनाचे विविध विभाग, राष्ट्रीय सामाजिक योजना, विविध विद्यापीठे व महाविद्यालये यांनी सहकार्य करावे असे आवाहन  देशपांडे यांनी केले.

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी यावर टीका करत म्हटले आहे की, राज्य सरकार महाविद्यालयीन प्रवेशासाठी मतदार नोंदणी बंधनकारक करणार आहे. मोदी सरकारने स्वतः मतदान बंधनकारक नाही असे स्पष्ट केले आहे. मतदान “ROP Act 1950” अन्वये अधिकार आहे पण कर्तव्य नाही अशी कबुली दिली आहे मग मतदारनोंदणी शिक्षणासाठी बंधनकारक कशी करणार? युवकांमध्ये मतदानाबाबत उत्साह वाढलाच पाहिजे. निवडणूक आयोगाच्या पत्रात विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जावर मतदार नोंदणी प्रक्रियेची लिंक असावी व मतदान साक्षरता हा विषय अभ्यासक्रमात आणावा असे म्हटले आहे.  विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत उत्साह वाढवण्यासाठी मतदान अधिकार व फायदे यावर व्यापक प्रबोधन मोहीम आयोगाला अभिप्रेत आहे.

मतदार नोंदणी प्रवेशासाठी बंधनकारक म्हटले नाही. सरकार संविधान आणि कायद्याच्या चौकटीत चालवावे लागते,मनमर्जी प्रमाणे नाही. यापेक्षा उच्च शिक्षण मंत्रालयाने शिक्षणाचा व्यापक प्रसार कसा होईल याकडे लक्ष द्यावे. तसेही महाराष्ट्राचे महाविद्यालयीन शिक्षण नोंदणी प्रमाण केवळ ३२% आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *