…. असा हिंदुस्थान नको आणि तो आम्ही होऊ देणार नाही !
…. असा हिंदुस्थान नको आणि तो आम्ही होऊ देणार नाही !
शेगाव, दि. 18 नोव्हेंबर :
मागील आठ वर्षात देशात सामाजिक विषमता वाढीस लागली आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे, तरुण वर्ग नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यांच्या समस्या कोणी ऐकत नाही. मुलांच्या शिक्षणावर पालकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. मुले इंजिनिअरींगचे शिक्षण घेतात पण त्यांना एखादी खाजगी टॅक्सी चालवावी लागते किंवा किरकोळ काम करावे लागते. पालकांनी यासाठी एवढा खर्च केला का ? तरूण, शेतकरी उघड्यावर आहेत आणि दुसरीकडे याच हिंदुस्थानात काही मुठभर लोकच श्रीमंत होतात, असा हिंदुस्थान नको आहे आणि आम्ही तो होऊ देणार नाही, असे खा. राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.

संत गजानन महाराज यांची पवित्र भूमी शेगाव येथे आज लाखो लोकांच्या अतिप्रचंड विशाल सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले. विशाल व्यासपीठावर देशभरातील व राज्यातील नेते उपस्थित होते. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत लोक राहुल गांधींना ऐकण्यासाठी आलेले दिसत होते. या विशाल जनसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला आधाराची गरज आहे. पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळ यात शेतक-याचे मोठे नुकसान होते पण त्यांना भाजपा सरकार मदत करत नाही, नुकसान भरपाई देत नाही. पीकविमाही मिळत नाही. शेतकरी 50 हजार, एक लाख रुपयांचे कर्ज काढतो पण ते माफ होत नाही आणि मोठ्या उद्योगपतींचे लाखो करोडे रुपयांचे कर्ज माफ होते. शेतकरी संकटात सापडतो, त्रस्त होतो तेव्हा तो जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतो. विदर्भातील शेतक-यांचे दुःख, व्यथा कळताच युपीए सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी केली पण आजचे सरकार शेतक-यांचा आवाज ऐकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पंतप्रधान यांनी शेतक-याची पीडा, समस्या, दु:ख ऐकून घेतले तर एकही आत्महत्या होणार नाही.

कन्याकुमारीपासून ही पदयात्रा सुरू झाली असून जनतेचे ऐकून घेत आम्ही पुढे जात आहोत. मी तुमचे दुःख ऐकण्यासाठी आलो आहे. पण काही लोक हिंसा, द्वेष, भिती पसरवण्याचे काम करत आहेत. भीती, हिंसा, द्वेष यामुळे नुकसान होते, प्रेम, बंधुभाव अहिंसा याने लोक एकछूट होतात. विरोधक विचारात की देशात कुठे आहे सिंसा, भीती, द्वेष ? असा प्रश्न विचारणा-या विरोधकांनी जर रस्यावर उतरून लोकांचा आवाज ऐकले तर मग कळेल की द्वेष, हिंसा, भिती कुठे आहे ?
द्वेष व हिंसेने देशाचा फायदा होत नाही. महाराष्ट्र भूमी ही साधु, संत, महापुरुषांची भूमी आहे. यांनी लोकांना प्रेम दिले, लोकांना जोडण्याचे काम केले आम्हीही तेच करत आहोत. आम्ही देश जोडण्याचे काम करत आहोत. ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात हिंसा अनुभवली आहे ते द्वेष पसवत नाहीत. शेतकरी, कामगार यांच्या मनात द्वेष असूच शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी. शिवाजी महाराज व आपण यांच्यात खूप फरक आहे, ते महान होते, ते महाराष्ट्राचा आवाज होते. शिवाजी महाराज यांना त्यांच्या आई जीजाऊ यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने ते गेले म्हणून ते छत्रपती बनले.
महात्मा गांधी यांचे पणतू आणि मराठीतून भाषण करत जनतेला साद घातली,…ते म्हणाले, सकाळी मी राहुल गांधी यांच्याबरोबर पदयात्रेत चाललो, राहुल गांधी हे सामान्य जनता, गरिब, पीडीत लोकांचे दुःख हलके करण्याचे काम करत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी ज्या रस्त्याने जातात तिथली गरिबी दिसू नये म्हणून पडदे लावून गरिबीचे दृष्य झाकले जाते. महात्मा गांधी हे सुद्धा गरिबांच्या झोपडीत जात असत. दांडी मार्चमध्ये महात्मा गांधी, मोतिलाल नेहरू,पंडित नेहरू सहभाग झाले होते आणि आज मला राहुल गांधींसोबत चालण्याचे भाग्य लाभले. भारत जोडो यात्रेवर विरोधक टीका करत आहेत. देश तुटला आहे का असा प्रश्न विचारणारे लोक देश तोडण्याची वाट पहात आहेत का ? असा सवाल करत, दृष्टा नेता तोच असतो ज्याला देश तुटण्याची चाहुल लागताच तो देश जोडण्यासाठी बाहेर पडतो. तुटल्यानंतर जोडण्याचे काम करण्याचे औचित्य काय ?
