गोद्री येथील कुंभ महोत्सवसाठी चोख व्यवस्था करा

0
20220425_153306

गोद्री येथील कुंभ महोत्सवसाठी चोख व्यवस्था करा…

मुंबई, दि. 15 नोव्हेंबर :
जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी देशभरातून अंदाजे 50 ते 60 हजार भाविक अपेक्षित आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी सर्व व्यवस्था चोखपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होणाऱ्या ‘अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३’ बाबत सह्याद्री अतिथगृह येथील पूर्वतयारी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, या कार्यक्रमासाठी देशभरातून हजारो भाविक येतील. त्यामुळे कार्यक्रम स्थळी पायाभूत सुविधा चोख असाव्यात. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करावे. या कार्यक्रमाच्या नियोजनातील सर्व विभागांतील कामांच्या समन्वयासाठी जिल्ह्याचे पालक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती करावी. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून भाविकांना एक चांगला अनुभव घेता आला पाहिजे, अशा सुविधा सर्व यंत्रणांनी द्याव्यात. सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, ऊर्जा विभाग, ग्रामविकास विभाग, गृह विभाग यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारी पार पाडाव्यात. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास नियोजन समितीमार्फत त्या सोडविण्यात येतील.

गोद्री येथे जाणारे प्रमुख मार्ग, रस्त्यांची कामे सावर्जनिक बांधकाम विभागाने त्वरित हाती घेवून पूर्ण करावीत. गोद्री गावात हेलिपॅड तयार करणे, अतिक्रमण काढणे ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. पिण्याचे पाणी, स्नानगृह, सांडपाणी व्यवस्था करावी. ऊर्जा विभागाने या ठिकाणी नवीन व तात्पुरत्या स्वरुपात ट्रान्सफॉर्मर लावणे, विजेच्या उपक्रेंद्राची क्षमता वाढविणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे या कामाला प्राधान्य द्यावे. परिवहन विभागाने कुंभस्थानी तसेच गोद्री येथे जाण्यासाठी जादा बसेस सोडाव्यात व गर्दी होऊ नये यासाठी वाहतूकीचे नियोजन करावे. ग्रामविकास विभागाने महिला बचतगटांचे स्टॉल्स लाववावेत, वैद्यकीय सुविधा, कायदा व सुव्यवस्था देखील चोख ठेवावी.

अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *