ज्येष्ठ शिवसेना नेते खा. गजानन कीर्तिकर शिंदे गटात
ज्येष्ठ शिवसेना नेते खा. गजानन कीर्तिकर शिंदे गटात..
मुंबई, दि. 11 नोव्हेंबर :
शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या मेळाव्यात खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे देखील उपस्थित होते.
मुंबईतील दादर माहीम परिसरातील विभाग क्रमांक १० च्या वतीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी एका विशेष मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी देखील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे काही आमदार घरवापसी करणार असे दावे केले जात असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन त्यांचे नातू आदित्य ठाकरे खुशाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी गेले असतानाच गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचे काम करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रभादेवी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला खासदार राहुल शेवाळे, शिवसेना उपनेते आमदार सदा सनवणकर शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, तसेच विभाग प्रमुख गिरीश धानुरकर व महिला विभाग संघटिका प्रिया गुरव, शाखाप्रमुख अजय कुसुम, संतोष तेलवणे, अभिजीत राणे,योगेश पाटील,संदीप देवलेकर, मिलिंद तांडेल हेदेखील उपस्थित होते.
