ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक थेट बांधावर
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक थेट बांधावर
मुंबई, दि, 7 नोव्हेंबर :
ऊसतोड कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी माजलगाव महेश साखर कारखाना बीड परिसरात शेताच्या बांधावर जाऊन ऊसतोड कामगारांची चर्चा केली व त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना तयार करण्यात येत असून त्या अंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी शासनाने व्यापक मोहीम राबवून ओळख प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे.
यावेळी औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे, चे बाळासाहेब सोळंकी, रविंद्र शिंदे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बीड, ऊसतोड कामगारांचे पदाधिकारी, आणि ऊसतोड कामगार, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यासह विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने राज्यात नुकतेच शासकीय वसतिगृह देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ते अंतर्गत नगर जिल्ह्यातील कर्जत ,जामखेड व बीड या ठिकाणी प्रत्यक्ष वसतिगृह सुरू झाली आहेत.
