छगन भुजबळांना संभाजी ब्रिगेडचा कायमच पाठिंबा..

0
IMG-20221030-WA0114

छगन भुजबळांना संभाजी ब्रिगेडचा कायमच पाठिंबा..

नाशिक, दि.३० ऑक्टोबर :-
शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले जावे अशी ठाम भूमिका घेतल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळ हे लढा देत असल्याने संभाजी ब्रिगेडचा कायमच पाठिंबा असेल अशी ठाम भूमिका संभाजी ब्रिगेडच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सप्नील इंगळे, शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील, शरद लभडे, विकी गायधनी, मंदार धिवरे, अमोल जाधव, विवेक केदारे, दिपक देवरे, राहुल तरळ, विशाल अहिरराव, प्रेम भालेराव, प्रतीक पगार, संतोष माळवे, हरिष पाटील, राकेश जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच महापुरुषांचे विचार बहुजन समाजात रुजविण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अविरत काम सुरू ठेवावे. बहुजन समाजात जनजागृती करत रहावी असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *