राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ व ५ नोव्हेंबरला शिर्डीत अभ्यास शिबीर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ व ५ नोव्हेंबरला शिर्डीत अभ्यास शिबीर..
मुंबई दि. 29 ऑक्टोबर –
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या अभ्यास शिबिराचे ४ व ५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वर्तमानस्थितीबाबत आकलन वाढवणे व भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासंदर्भात या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास शिबिराला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत. हे शिबीर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून होणार आहे.
पक्षाची २३ वर्षाची वाटचाल व योगदान, पक्षाने राज्यात केलेले काम, देशाची व जगाची परिस्थिती यावर दोन दिवस चर्चा होणार आहे. पक्षाच्यावतीने एक अॅप काढले आहे. या अॅपमध्ये पक्षाची सर्व माहिती, निर्णय पुढच्या पिढीला अवगत होणार आहे. या शिबीराला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून मोकळी चर्चा केली जाणार आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.
