महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल

0
20220709_104821

महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल….

मुंबई, दि. 16 ऑक्टोबर :
देशात मागील वर्षभरात नव्याने सुरू झालेल्या ४२ युनिकॉर्नपैकी ११ युनिकॉर्न महाराष्ट्रातील आहेत. रजिस्टर्ड स्टार्टअप्समधील सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2018 मध्ये राज्याचे स्वतंत्र स्टार्टअप धोरण आखले होते. यामुळे राज्यात स्टार्टअप्सच्या विकासासाठी इकोसिस्टीम तयार झाली. आपण देशाला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. यामध्ये इनोवेशन्सचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, देशामध्ये आता 5G तंत्रज्ञान लागू झाले आहे. हे तंत्रज्ञान आपण काळाच्या खूप आधी स्वीकारले आहे. भविष्यात 6G तंत्रज्ञान स्वीकारणारा आपला भारत देश हा जगातील पहिला देश ठरेल. इंटरनेटचे जाळे आता देशातील गावोगावी आणि दुर्गम भागातही पोहोचले आहे. 5G तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रातील नवनवीन संकल्पना दुर्गम भागापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवता येतील. किंबहुना आपत्ती व्यवस्थापनासाठीही नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्स योगदान देऊ शकतील.

शासनाच्या विमा विषयक विविध योजना आहेत. याचेही नियोजन करण्यासाठी कल्पक स्टार्टअपचा वापर करता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. स्टार्टअपविषयक कोणत्याही उपक्र, योजनेसाठी राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत भरीव अर्थसहाय्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *