छगन भुजबळ म्हणजे शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व

0
IMG-20221013-WA0100

छगन भुजबळ म्हणजे शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व….

मुंबई, दि.१३ ऑक्टोबर :-
दिल्लीतील सर्वात उत्तम निवासस्थान हे महाराष्ट्र सदन आहे. दिल्लीच्या सौंदर्यात भर घालणारे हे महाराष्ट्र सदनाचे काम छगन भुजबळ यांनी केलं असचं काम त्यांनी महाराष्ट्र, मुंबई तसेच नाशिक जिल्ह्यात उभं केलं. कुठल्याही कामचा निश्चय केल्यानंतर ते त्यात झोकून काम करणे हा भुजबळांचा गुण आहे. भुजबळ याचं नेतृत्व शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व आहे. देशात विकास करणारा उत्तम राजकारणी म्हणून भुजबळांचा उल्लेख करावा लागेल, या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा गौरव केला.

छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने मुंबईतील ‘षण्मुखानंद’ सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. शरदचंद्र पवार हे बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ‘बहुजनांचा नायक छगन भुजबळ’’ व फोटोबायग्राफीचे पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शरदचंद्र पवार म्हणाले की, आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण याच सभागृहात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना करण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर लगेच त्यांच्याच अध्यक्षतेखाली शिवाजीपार्कवर मेळावा देखील पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वाटचालीत त्यांचे योगदान हे अतिशय महत्वाचे आहे. कोणतेही काम हाती घेतलं की ते उत्तम व नेटकं करायचे ही छगन भुजबळ यांची खासियत आहे.

छगन भुजबळ हे माझे ज्येष्ठ सहकारी असून त्यांची ६१ वी व आता अमृतमहोत्सला उपस्थित आहे. मी त्यांच्या कायम पाठिशी आहे. देशात सावित्रीबाई, महात्मा फुले यांचे विचार पुढे नेण्याचे काम भुजबळ करत आहे. मी ज्या पुणे विद्यापीठात शिक्षण घेतले त्या विद्यापीठाला फुले यांचे नाव भुजबळांमुळे मिळाले याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. तसेच देशात काश्मीर राहण्यासाठी फारूक अब्दुल्ला यांच्या वडिलांचे योगदान अतिशय महत्वाचे राहिले. देशात एकात्मता टिकविण्यासाठी फारूक अब्दुल्ला यांनी काम केले. ते आज छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहिले हा आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *