मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात बचत गटांचे प्रदर्शन भरवा.

0
IMG-20221011-WA0196

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात बचत गटांचे प्रदर्शन भरवा.

मुंबई, दि. 12 ऑक्टोबर :

मुंबई शहरातील बचत गटांनी उत्पादित केलेले साहित्य विक्रीसाठी सहा लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एक बचत गटांचा स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करा. महिला बाल विकास विभाग आणि मुंबई महापालिका यांनी हा उपक्रम रोटेशन पद्धतीने उपक्रम राबवावाा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी रवींद्र नाट्य मंदिर येथे महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत  मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा मेळावा आयोजित केलेला आहे. मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

यावेळी महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार तलीम सेलवन, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, प्रधानसचिव आय.ए.कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रूबल अग्रवाल उपस्थित होते.

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात बचत गटांचे स्टॉल लावल्यास नागरिकांना देखील किफायतशीर किंमतीत वस्तू उपलब्ध होतील. मुंबई शहरातील बचत गटांसाठी दिवाळी सणापूर्वी हा मेळावा आयोजित केल्यामुळे,बचत गटांच्या उत्पादनांची विक्री होईल. आज महिलांना कर्ज देताना बँक सुद्धा पुढे येत आहेत. कारण महिला बचत गटांना दिलेले कर्ज महिला 100% परतफेड करतात त्याचबरोबर महिला देखील महिला बचत गटाचा उद्योग वाढवण्याबरोबर आपल्या कुटुंबाला देखील बचत गटाच्या माध्यमातून हातभार लावत असतात. महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. माविम मार्फत उत्पादित वस्तूंचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग यावर भर देण्यात यावा.

दिल्ली येथे भरवण्यात येणारे महिला बचत गटांचे प्रदर्शन तसेच सरस सारख्या प्रदर्शनांना खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो त्यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळवून देणे यासाठी काम होणे गरजेचे आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची ही चळवळ वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असेही ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *