‘शिवसेना’ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या हाती ‘मशाल’ !

0
FB_IMG_1665474182550

‘शिवसेना’ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या हाती ‘मशाल’ !

मुंबई, दि. 11 ऑक्टोबर :
शिवसेनेच्या बंडखोरीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेना व पक्षचिन्ह धनुष्यबाण हेही गोठावले होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा वाद आयोगात गेल्यानंतर हा निर्णय झाला होता त्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवे नाव व चिन्ह देण्याचा निर्णय होऊन निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पक्षाचे नाव तर पक्षचिन्ह मशाल मिळालेले आहे.

उद्धव ठाकरे यांनी तीन नावे व तीन चिन्हं दिली होती. त्यातून मशाल चिन्ह व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव मिळाले आहे. एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे पक्षाचे नाव देण्यात आले आहे पण त्यांनी सादर केलेली तिन्ही चिन्हे नाकारली असून तीन नवे पर्याय देण्यास निवडणूक आयोगाने सांगितले आहे. उद्धव ठाकरे गटाने दिलेली नावे व पक्षचिन्हांवर शिंदे गटाने तीच नावे देऊन गोची करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी मशाल, उगवता सूर्य व त्रिशूल ही चिन्हे दिली होती, तर एकनाथ शिंदे गटाने तुतारी, उगवता सूर्य व तलवार ही चिन्हे मागितली होती.

मशाल चिन्हावर यापूर्वी शिवसेनेने निवडणूक लढवली होती. छगन भुजबळ या चिन्हावर निवडणून आले होते.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणले आहे. मुख्यमंत्रीपद मिळवले व त्यानंतर पक्ष व पक्षाच्या चिन्हावरही दावा ठोकला होता. हे सर्व प्रकरण अजूनही संपलेले नसून न्यायालयीन लढाईही बाकी आहे. निवडणूक आयोगाने तात्पुरता निर्णय दिलेला आहे तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या पात्रतेचा निर्णही अद्याप झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *