मुलायमसिंहांच्या निधनाने मातीशी नाळ जोडलेला नेता हरपला.
मुलायमसिंहांच्या निधनाने मातीशी नाळ जोडलेला नेता हरपला.
मुंबई, १० ऑक्टोबर-
समाजवादी पार्टीचे जेष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने देशाच्या राजकाणातील अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले असल्याच्या भावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
आपल्या शोक संदेशात ते म्हणाले की मुलायम सिंह यादव म्हणजे मातीशी नाळ जोडलेला नेता. उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांचा विशेष असा दरारा असायचा. नेताजी अशी ओळख असलेले मुलायम सिंह हे खऱ्या अर्थाने राजकारणाच्या आखाड्यातील कसलेले पैलवानच होते. शेतकऱ्यांसाठी आपला आवाज बुलंद ठेवानारे मुलायम सिंह यादव यांची लोकसभेतील भाषणे आजही पहिली की त्यांच्यातला संघर्षशील नेत्याचे दर्शन होते.
मुलायम सिंह यादव म्हणजे हेलिकॉप्टर मधून ज्या गावाच्या वरून प्रवास करतील त्या गावचे नाव सांगणारा माणूस, कार्यकर्त्यांना कसे बांधून ठेवावे याचे कसब त्यांच्यापाशी होते. जुने जाणते कार्यकर्त्यांशी देखील त्यांचा जिव्हाळा असायचा. उत्तरप्रदेश चे तीन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, १० वेळा आमदार, ७ वेळा खासदार म्हणून ते विजयी झाले आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. मी व माझे कुटुंबीय नेताजी यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रध्दांजली!!
