धनुष्यबाणाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार !
धनुष्यबाणाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार !
नवी दिल्ली, दि. २७ सप्टेंबर :
शिवसेना उद्धव ठाकरे यांची, का एकनाथ शिंदे यांची, धनुष्यबाण कोणाला मिळणार याटी निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधिशांच्या खंडपीठात हा निर्णय झाला.
सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली. याआधी ठाकरे गटाला कागदपत्रे जमा करण्याचे निर्देश हे निवडणूक आयोगाने दिले होते. ठाकरे गटाकडून दोनवेळा मुदतवाढीची मागणी केली होती. ही लढाई सर्वोच्च न्यायालयात असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. शिवसेना कुणाची याचा निर्णय महिना, दीड महिन्यात लागू शकतो.
ठाकरे गटाकडून फक्त सभागृहातील फुटीवर विचार केला जात आहे पण पक्षातही फुट पडली आहे त्यामुळे पक्ष फुटीवर निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना नाही असा युक्तीवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला त्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाने द्यावा असा युक्तीवाद शिंदे गटाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केला. तर निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, निवडणूक आयोगाचे काम हे विधानसभा अध्यक्षांच्या कामापेक्षा वेगळं आहे असा युक्तीवाद केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील अॅड. दातार यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयात अजून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ जणांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय मात्र अजून झालेला नाही. या प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होईल.
