‘त्या’ झोपट्टपट्टीवासियांना पर्यायी घरे उपलब्ध करून द्या !                                        

0
IMG-20220926-WA0123

‘त्या’ झोपट्टपट्टीवासियांना पर्यायी घरे उपलब्ध करून द्या !
मुंबई, दि. २६ सप्टेंबर :
विलेपार्ले येथील नुकसानग्रस्त होऊन कोसळलेल्या १० बांधकामांच्या बदल्यात पर्यायी घरे के पश्चिम विभागातच मुंबई महापालिकेने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

अंधेरी तालुक्यातील विलेपार्ले पश्चिम, मुंबई, मिठीबाई कॉलेज जवळ, येथील रुतुराज हॉटेल जवळील नाल्याजवळील इंदिरानगर येथे काल रात्री ०९.३० वाजता १० झोपडी सदृश दोन मजल्यांची बांधकामे खचल्याने कोसळली. या भागात भेट देतेवेळी पर्यटनमंत्री लोढा बोलत होते. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र १० बांधकामे कोसळून २० लाख, रूपयांची इतकी वित्तहानी झाली आहे तसेच १४  घरांना तडे गेले आहेत. नाल्यालगतच्या उर्वरित झोपड्यांच्या लगतची भिंतीचे बळकटीकरण करण्याचे कामकाज करण्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन कार्यालयामार्फत (SWM) तातडीने सुरू करण्याबाबत आजच बैठक घेवून के पश्चिम विभाग कार्यालयाने  बैठक घ्यावी निर्देश सहायक आयुक्त यांना मंत्री लोढा यांनी दिले.

यावेळी विलेपार्ले विधानसभा मतदार संघाचे आमदार पराग अळवणी, अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार अमीत साटम,स्थानिक नगरसेवक सुनीता राजेश मेहता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांचेसोबत पश्चिम उपनगर उपविभागीय अधिकारी सुनील माळी, तहसीलदार अंधेरी सचिन भालेराव, के पश्चिम बॉर्ड चे सहायक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण, स्थानिक नागरिक उपस्थित होते.                                                      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *