पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणा-यांना ठेचून काढा
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणा-यांना ठेचून काढा…..
मुंबई, दि. 24 सप्टेंबर :
PFI वर जी कारवाई केंद्रीय यंत्रणांनी केली ती योग्यच आहे. ज्यापद्धतीने या देशात देशविघातक वातावरण निर्माण करण्याचे जाळे विणले जाते, त्याविरोधात हा लढा आहे. PFI प्रकरणात पुण्यात जी घोषणाबाजी झाली, त्या वर्तणुकीला ठेचून काढलं पाहीजे, अशी भाजपाच्यावतीने गृहमंत्र्यांकडे मागणी आहे, असे भाजपाचे आशिष शेलार म्हणाले..
ज्या ज्या वेळी देश बलवान होतो, त्यावेळी देश विघातक शक्ती स्वतःची नखं दाखविण्याचे प्रयत्न करतात. आम्हाला आनंद आहे की, केंद्र सरकारने यांना उखडून टाकण्याचे ठरविले आहे. या कारवाईला आमचे समर्थन आहे. पटना असो किंवा मोदींची सभा असो.. मोदींना लक्ष्य करणारे, बोलणारे सगळेच कधी कधी देशाच्या स्वाभिमानाचा त्यांना विसर पडतो. काल परवा हजार – दोन हजार लोकांसमोर एनएसईमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकपात्री प्रयोग केला. त्या सभेत पीएफआय किंवा तत्सम दहशतवादी इस्लामी संघटनांवर बोलण्याचे त्यांनी का टाळले? याचे उत्तर ते देतील का, असा प्रश्न आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला.
