… तर देवेंद्र फडणवीस देशासाठी मोठे कार्य करतील.

0
IMG-20220919-WA0037

… तर देवेंद्र फडणवीस देशासाठी मोठे कार्य करतील.

मुंबई, दि. 21 सप्टेंबर :

देवेंद्र फडणवीस देशाकरिता आशेचे किरण आहेत असे नमूद करून देवाची इच्छा असेल तर देवेंद्र फडणवीस देशासाठी खूप मोठे कार्य करतील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

पदप्रतिष्ठेला फार महत्व दिले नाही. परंतु आज लोक पदाच्या मागे लागतात, असे नमूद करून पदाची लालसा सोडल्यास आपण देशाची अधिक चांगली सेवा करू शकतो असे राज्यपालांनी सांगितले. असंख्य संकटे आली, तरीही आपला देश आणि संस्कृती साधू, संतांच्या त्यागामुळे जिवंत आहे असे सांगून प्रत्येकाने निष्ठेने आणि समर्पित भावनेने कार्य केले तर भारत महान राष्ट्र होईल.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘भगतसिंह कोश्यारी : अ सोल डेडिकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचे  राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुस्तकाचे लेखक डॉ तुषार कांती बॅनर्जी तसेच निमंत्रित उपस्थित होते.

लेखक तुषार कांती बॅनर्जी यांनी प्रास्ताविक केले तर आनंद सिंह यांनी सूत्र संचलन केले. पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या आशादीप संस्थेचे अनिरुद्ध मंडळ हे देखील यावेळी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *