फाॅक्सकाॅन प्रकरणाची निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा.

0
images (22)

फाॅक्सकाॅन प्रकरणाची निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा.

मुंबई, दि. 16 सप्‍टेंबर :-

वेदांता फाॅक्सकाॅन हा प्रकल्प महाराष्ट्रात होता तर, या प्रकल्पाची पायाभरणी, भूमिपूजन झालं होतं का? प्रकल्प महाराष्ट्रात होता तर तो गुजरातला नेला गेला तर राज्यात तो होता कधी? त्याच्या जागेचा प्रश्न सोडवला कधी? करारनामा झाला कधी? या प्रश्नांची उत्तर आम्हाला पेंग्विन सेनेकडून हवी आहेत. या प्रश्नांची उत्तर पेंग्विन सेना देत नसेल तर निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी केली.

फॉक्सकोन प्रकल्प महाराष्‍ट्रात यावा म्‍हणून कर सवलती दिल्‍याचा कागदोपत्री एखादा पुरवा दाखवा. या प्रकरणी उध्‍दव ठाकरे यांची शिवसेना आणि आदित्‍य ठाकरे यांची पेग्विन सेना भ्रम निर्माण करून मराठी माणसाला थापेबाजी आणि गुजराती माणसाबद्दल शत्रुत्‍व निर्माण करायचे काम करीत आहे. बोलायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असे आता चालणार नाही. महाराष्ट्र या भुलथापांना बळी पडणार नाही.

वेदांताचे सर्वेसर्वा अनिल अगरवाल यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी सांगितल आम्ही महाराष्ट्रात हब करणार आहोत. राज्यात यामुळे रोजगार निर्माण होणार आहेत, मग पेंग्विन सेना असं का म्हणते आणि राज्यात हा प्रकल्प येणार आहे असंही अगरवाल म्हणाले आहेत. दोन वर्ष झाले या प्रकल्पाची चर्चा चालू आहे. तर कशाच्या आधारावर तुम्ही म्हणत आहात की, तो गुजरातला गेला. दोन वर्ष चर्चा झाल्यानंतरही त्याबाबत करार चर्चा आणि समतीपत्र झाले नसेल आणि स्वत: पेंग्विन सेना प्रमुख म्हणत असतील आम्ही हा प्रकल्प आणला तर प्रत्यक्ष कामे का नाही झाली. या दोन वर्षाच्‍या काळात कटकमिशन आणि वाटवारी झाली असावी असा संशय येतो आहे. मधल्‍या काळात तत्‍कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्‍पाचा महाराष्‍ट्राला उपयोग काय असा सवाल केला होता. यावरुन आम्‍ही उपस्थित केलेल्‍या कटकमिशनच्‍या शंकेला बळ मिळते आहे. असे सांगत आमदार मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अनेक प्रश्‍नांची सरबत्‍ती केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *