माजी आ.सुधाकरपंत परिचारक यांचे निधन..
पंढरपूर : 18 ऑगस्ट…
जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे पुणे येथे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातच मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. ते ८४ वर्षांचे होते.
5 ऑगस्ट रोजी परिचारक यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र श्वसनाच्या विकारामुळे रविवारपासून ते अत्यवस्थ होते. अखेर सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
परिचारक हे महाराष्ट्र 25 वर्ष आमदार होते. तसेच दिर्घकाळ महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. बंद पडलेल्या सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. स्व. वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते.
