कोरोना संकटातही व्यावसायिक विकासाची ‘उमेद’!

0
20200816_225725

.ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे महिला बचतगटांना आवाहन.

ऑनलाइन  मेळाव्यात राज्यभरातून सुमारे एक लाख महिला सहभागी.

मुंबई, दि. १६ :

महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून तयार केलेले साहित्य व उत्पादनास ॲमेझॉनद्वारे जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे काम ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना काळात ऑनलाईन खरेदीस चालना मिळाली आहे. त्या अनुषंगाने कोरोना संकटामुळे निर्माण झालेली स्थिती ही अर्थार्जनाच्या संधीत परावर्तित करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे आयोजित ऑनलाइन महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात राज्यभरातून जवळपास एक लाख महिला सहभागी झाल्या.

‘उमेद’ अभियानातील स्वयंसहायता गटांनी कोरोना संकटकाळात जागतिक बाजारपेठेत तग धरण्याच्या दृष्टीने स्वतःच्या व्यवसायामध्ये आमूलाग्र बदल करावा. कोरोनाकडे संकट म्हणून न बघता या काळात व्यावसायिक विकास करण्याची संधी म्हणून बघावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त उमेद अभियानातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिला व समुदाय संसाधन व्यक्तींसाठी ऑनलाईन महिला उद्बोधन मेळावा मंत्री मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सतार, विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मेळाव्यास जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर संबंधित अधिकारी यांच्यासह सर्व जिल्ह्यांमधून महिला ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *