… अन् मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करता ?

0
AUT

… अन् मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करता ?

मुंबई, दि २५ ऑगस्ट

शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा बंडखोरांवर हल्लाबोल सुरुच आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. ज्या बाळासाहेबांच्या मुलाने सर्व काही दिले त्याच्या पाठित खंजीर खुपसायचा, त्यामुळे यांच्यासाठी ‘गद्दार’हा शब्दच योग्य आहे, असा घणाघाती हल्ला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

विधिमंडळात माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे सरकार स्थापन झाले तेव्हा दोन मंत्री झाले. मंत्री ठरवायला ४२ दिवस लागले पण जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाहीत. खोके ओके हे काही झोंबण्यासारखे नाही. मुख्यमंत्र्यांची भाषा योग्य नाही. या आमदारांवर कुणाचा अंकुश नाही. विभागाच्या पुनर्रचनेत कुणीही पाठिंबा दिला तरी चालेल,कधीही निवडणुका घ्या आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. आधी नियुक्ती केली जाते मग थांबवली जाते. हे सरकार फक्त स्वार्थासाठी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *