मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील घराजवळच ‘छमछम’चा बाजार !

0
images (37)

मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील घराजवळच ‘छमछम’चा बाजार.

मुंबई, दि. 24 ऑगस्ट :

राज्यात अनेक ठिकाणी डान्स बार सुरु झाले आहेत ते सकाळपर्यंत सुरु असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरापासून हाकेच्या अंतरावर अनेक डान्सबार सुरु असल्याचे उघड झाले आहे. एका वृत्तवाहिनीने एक ऑपरेशन केले, ठाण्यात सर्व नियमांचे उल्लंघन करुन सकाळपर्यंत डान्स बार सुरु असल्याचे, पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष डान्सबारमध्ये जाऊन दाखवले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला.

अजित पवार म्हणाले, डान्स बारबाबत आमच्या काळात आर. आर. पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आणि डान्स बारवर बंदी घातली परंतु, अधुनमधून कोणत्या तरी भागात डान्स बार सुरु असल्याच्या बातम्या येत राहतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिध्द केल्यानंतर या सभागृहात केलेल्या भाषणात “१६ डान्सबार फोडणारा हा एकटा एकनाथ शिंदे आहे”, अशी माहिती त्यांनी मोठ्या आवेशाने या सभागृहात सांगितली होती.

परंतु आता त्यांच्याच घराजवळ डान्सबार सुरू आहेत. ॲन्टीक पॅलेस, आयकॉन, आम्रपाली या डान्सबारमध्ये जाऊन वृत्तवाहिनीने सर्व शुटिंग केले आहे. ज्याप्रमाणे त्यांनी मागील काळात डान्सबार विरोधी भूमिका घेतली होती, त्याप्रमाणे केवळ ठाण्यातीलच नाही तर राज्यातील सर्व डान्सबार विरोधात भूमिका घेतील आणि बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करतील अशी खात्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *