झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्यायासाठी ‘आप’ रस्त्यांवर !
झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्यायासाठी ‘आप’ रस्त्यांवर !
मुंबई, दि. 24 ऑगस्ट :
मुंबई विमानतळाच्या अखत्यारीत जमिनीवरील विले-पार्ले व अंधेरी विभागातील झोपडपट्टीतील रहिवाशीयांना अदानी (MIAL) व्यवस्थापनेमुळे विविध नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा पत्र व्यवहार करून देखील झोपेचं सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
मुंबईचे नेते सुंदर पडमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला मुंबई कार्याध्यक्ष द्विजेंद्र तिवारी आणि मुंबईचे नेते पायस वर्गीस, ॲड. संदीप कटके, मेहमूद देशमुख, डॉ संजय कांबळे, रमेश देशमुख, आदित्य मांजरेकर उपस्थित होते. त्यांनतर अदानी कार्यालयात जाऊन आम अदमी पार्टीच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी अदानी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मागण्याचा २५ तारखेला विचारकरण्यात येईल असे आश्वासन दिले. सुंदर पडमुख, रमेश देशमुख, आदित्य मांजरेकर आणि स्थानिक रहिवाशांनी महानगरपालिका के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वायुंज यांची या समस्या संदर्भात भेट घेतली. सहाय्यक आयुक्त यांनी गणेशोत्सवा आधी रस्ता दुरुस्त केला जाईल असे आश्वासन दिले.
एमसी छागला मार्गाच्या दुरवस्थेमुळे पार्ले पूर्वेतील रहिवासी हैराण झाले आहेत. अनेक तक्रारी असूनही अधिकारी त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. अधिकारी हा रस्ता मुंबई महानगरपालिका किंवा MIAL च्या अंतर्गत येतो की नाही हे स्पष्ट करण्यास नकार देत आहेत. अधिकार्यांच्या हलगर्जीपणाला रहिवासी कंटाळले आहेत. आज शेकडो रहिवाशी आमच्यासोबत रस्त्यावर उतरले आहेत, आम आदमी पार्टी हा प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आप मुंबईचे नेते सुंदर पदमुख म्हणाले.
एमआयएएल आणि महानगरपालिका अशा प्रकारे त्यांच्या कर्तव्यापासून दूर राहतील हे धक्कादायक आहे. मुंबईकर कंटाळले व निराश झाले आहेत. आणि म्हणूनच आज शेकडो रहिवासी आंदोलनात सामील झाले, असे मत आम आदमी पार्टीचे नेते द्विजेंद्र तिवारी यांनी व्यक्त केले.
