छगन भुजबळांच्या प्रश्नांनी आरोग्यमंत्र्यांची उडाली भंबेरी

0
tanaji sawant

छगन भुजबळांच्या प्रश्नांनी आरोग्यमंत्र्यांची उडाली भंबेरी..

मुंबई, दि. २२ ऑगस्ट ;–

शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची विधिमंडळात चांगलीच भंबेरी उडत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रश्नांना उत्तरे देता आले नाही. तर आजु पुन्हा एकदा तानाजी सावंत यांची गोची झाली. यावेळी प्रश्नांची सरबत्ती अनुभवी आमदार व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भंबेरी उडाली..

सरकारने एकूण किती डास पकडले…डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले… यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का ? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का ? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची अक्षरशः भंबेरी उडाली.

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले, व डास घनता काढली असे उत्तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहात दिले.

या उत्तराने प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने माजी मंत्री छगन भुजबळ यांनी डासांचे वर्गीकरण आणि विच्छेदन यावर प्रश्न उपस्थित केले मात्र आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना याचे योग्य उत्तर देता आले नाही. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रश्नांच्या भडीमाराने आरोग्यमंत्री तानाजी सावंत गोंधळले आणि सभागृहात एकच हशा पिकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *