888

ED ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी !

मुंबई दि. २२ ऑगस्ट –

पावसाळी अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशीही विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकार विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय… गद्दारांचं सरकार हाय हाय!!!… आले रे आले गद्दार आले… अशा गगनभेदी घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *