फडणवीसांकडे गृह व वित्त, विखे पाटलांना महसूल तर मुनगंटीवार वन मंत्री..
फडणवीसांकडे गृह व वित्त, विखे पाटलांना महसूल तर मुनगंटीवार वन मंत्री..
मुंबई, दि. 14 ऑगस्ट:
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे…
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय, चंद्रकांत पाटील-उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, डॉ. विजयकुमार गावित-आदिवासी विकास, गिरीष महाजन-ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता, दादा भुसे-बंदरे व खनिकर्म, संजय राठोड-अन्न व औषध प्रशासन, सुरेश खाडे- कामगार,
संदीपान भुमरे-रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उदय सामंत- उद्योग, प्रा. तानाजी सावंत-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अब्दुल सत्तार-कृषी, दीपक केसरकर..शालेय शिक्षण व मराठी भाषा, अतुल सावे-सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण,शंभूराज देसाई-राज्य उत्पादन शुल्क, मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास..
