आमदार संजय शिरसाटांचे ‘ते’ ट्वीट आणि सारवासारव!

0
saamtv_2022-06_092841e1-20dd-4320-a5df-070cb3b67e30_SaamTv_1200675___2022_06_24T135215_893

आमदार संजय शिरसाटांचे ‘ते’ ट्वीट आणि सारवासारव!

मुंबई, दि. १३ ऑगस्ट –
बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी केलेले ट्वीट हे तांत्रिक चुकीमुळे नव्हते तर तो त्यांचा अंतरआत्म्याचा आवाज होता असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.

आमदार संजय शिरसाट हा त्यांचाच आवाज नव्हता तर बंड केलेल्या अनेक आमदारांना आपण चूक केली असं वाटायला लागलं आहे असेही महेश तपासे म्हणाले.

ट्वीट डिलीट करुन लगेच ते तांत्रिक चुकीमुळे झाल्याचे आमदार संजय शिरसाट सांगत असले तरी त्यांच्या चेहर्‍यावरील भाव आणि देहबोली खूप काही स्पष्ट करत होती असेही महेश तपासे म्हणाले.

आमदार संजय शिरसाट यांच्या ट्वीटनंतर या आमदारांना सत्तेचं लालच दाखवून घेण्यात आल्याचे कारस्थान भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे असा थेट आरोप करतानाच हे सगळं  जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *