आणखी एक मंत्री कोरोना पाॅझीटीव्ह !

0
20200815_150847

संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-19 ची टेस्ट करुन घ्यावी.

मुंबई दि. १५  ऑगस्ट

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची कोविड -19 ची चाचणी  पॉझिटीव्ह आली. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.
बाळासाहेब पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती त्यांचे चिरंजीव जशराज (बाबा) पाटील यांनी दिली आहे .

सातारा शासकीय विश्रामगृहातील दोन कर्मचाऱ्यांच्या संपर्कात ते आले होते. या दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. काळजी म्हणून त्यांनी टेस्ट घेतली असता ते ही पॉझिटिव्ह आले.

संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-19 ची  टेस्ट करुन घ्यावी, शिवाय किमान आठवडाभर विलगिकरणात रहावं असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *