भाजपा मित्रपक्षांना हळूहळू संपवतो..

0
Pawar

भाजपा मित्रपक्षांना हळूहळू संपवतो..

मुंबई, दि. १० ऑगस्ट;

महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेला धक्का दे बंडखोरांच्या मदतीने सरकार झाले असताना बिहारमध्ये मात्र भाजपाला नितीशकुमार यांनी जोर का धक्का दिला आहे. भाजपाला सोडून लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपा दणका दिला. देशातील या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य करताना भाजपावर तोफ डागली. भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो कारण पंजाबमध्ये अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा मोठा नेता त्यांच्यासोबत होता. आज तो पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्क्ष जे पी नड्डा यांनी नुकतेच देशात फक्त भाजपा हाच एकनेव पक्ष राहिल असे वक्तव्य केले होते याची आठवण करून देत यातून नितीश कुमार यांनी केलेली तक्रार स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *